मराठा समाजाची उद्या बैठक….

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मराठा समाजाच्यावतीने उमेदवार देण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी (ता. २९) दुपारी ४ वाजता सोलापुरातील छत्रपती शिवाजी प्रशालेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात होणार आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर लोकसभा मतदार संघातील ही बैठक होत आहे.

या बैठकीला मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, सोलापूर शहर येथील मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला सोलापूर लोकसभा मतदार संघातील इतर समाजाच्या प्रतिनिधींनीही उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीनंतर सोलापूर लोकसभा मतदार संघातील अहवाल शनिवारी (ता.३०) मनोज जरांगे पाटील यांना सादर केला जाणार आहे.