सांगली लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या जागेची चांगलीच चर्चा रंगली. यातच आता माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगलीच्या जागेवरुन जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळण्यामागच्या खेळीतील खरा खलनायक हा जयंत पाटील आहे. संजय राऊत यांच्याद्वारे जयंत पाटील यांनी खेळी खेळत्याची टीका विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांच्या प्रचार सभेत केली आहे.
वसंतदादा यांच्या नातवाला तिकीट मिळविण्यासाठी धडपड करावी लागते. ही दुःखद घटना आहे. हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून चालू आहे. या खेळातील खरा खलनायक हा जयंत पाटील आहेत. संजय राऊत यांच्या द्वारे जयंत पाटील यांनी ही खेळी खेळली असा घणाघाती आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला.