खासदार विशाल पाटील यांच्या संसदेतील मागणीला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. रेल्वेची मागणी करत विशाल पाटील यांनी खानापूर मतदारसंघात खानापूर आटपाडी कडेगाव तालुक्यातील रेल्वे जाणार आहे विटा मार्गे कराड पंढरपूर रेल्वे होणार आहेखरंतर लोकसभा निवडणूक झाल्यापासून नूतन खासदार खानापूर आटपाडी तालुक्यातून गायब झालेत अशी टीका विरोधकांनी सुरू केली होती.
परंतु खासदार विशाल पाटील हे खानापूर तालुक्याला ट्रेन आणण्यासाठी दिल्लीला जनतेने पाठवलेत हे आज त्यांच्या संसदेतील भाषणाने समोर आलेले आहे. आज त्यांनी कराड पंढरपूर रेल्वे व्हावी आणि ती आपल्या खानापूर आटपाडी व कडेगाव तालुक्यातून जावी यासाठी त्यांनी आपली भूमिका संसदेमध्ये जोरदार मांडली. रेल्वेची मागणी करत विषयी खानापूर मतदार संघातील आपल्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना चांगली चपराक दिली आहे.