पिकांचे उत्पादकता वाढवण्यासाठी विविध प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा या दृष्टीने राज्य सरकारने बाजरी मका सूर्यफूल व तूर या खरीप पिकांची पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली आहे. स्पर्धेत तालुका पातळीवर पहिले बक्षीस रुपये 5000, दुसरे बक्षीस तीन हजार रुपये, तिसरे बक्षीस दोन हजार रुपये, जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस दहा हजार रुपये, दुसरे बक्षीस 7000 रुपये, तिसरे बक्षीस पाच हजार रुपये तर राज्यपातळीवर पहिले बक्षीस 50 हजार रुपये, दुसरे बक्षीस 40 हजार रुपये व तिसरे बक्षीस 30 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
तरी पिक स्पर्धेत सहभागी होऊ इच्छित शेतकऱ्यांनी बांधवांनी बाजरी, मका, सूर्यफूल व तूर या पिकांसाठी 2 सप्टेंबर 2024 पर्यंत कृषी सहाय्यक किंवा कृषी पर्यवेक्षक किंवा मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावेत. एक शेतकरी चारही पिकांसाठी अर्ज करू शकतील. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे किमान 40 गुंठे त्या पिकाचे सलग पेरलेले क्षेत्राचा व अर्जासोबत तीनशे रुपये प्रवेश फी आवश्यक आहे. अर्जासोबत सातबारा आठ अ, बँक पासबुक, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे सादर करावीत असे आवाहन कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केला आहे.
