आजचे राशीभविष्य: शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2024

मेष-
यशस्वी लोकांच्या सहवासात आज तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांसाठी वेळ देणे अवघड होईल व्यस्त दिवस.

वृषभ
आज घरात वडीलधाऱ्या मंडळींचे अनुभवाचे बोल ऐकून घ्यायला काहीच हरकत नाही. ज्येष्ठ मंडळींनी सत्संगाची साथ सोडू नये. आज तुम्हाला एकांताची गरज भासेल.

मिथुन
आपल्या कार्यक्षेत्रात स्पर्धकांना कमजोर समजू नका. नोकरीच्या ठिकाणी आज नियमांची अंमलबजावणी काटेकरपणे करा. हितशत्रू टपूनच बसलेले आहेत. सतर्क रहा.

कर्क
व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध असतील. वैवाहिक जीवनातही आज समजूतदारपणा ची भावना राहील. इतरांच्या भांडणात यशस्वी मध्यस्थी कराल.

सिंह
नोकरीच्या ठिकाणी विरोधकांच्या काही उचापती चालूच राहतील. आरोग्यविषयक तक्रारींची वेळीच दखल घेणे आवश्यक आहे. दुकानदारांची थकलेली येणी वसूल होतील.

कन्या
नोकरदारांना नोकरीत बदल करायचा असेल तर योग्य संधी चालून येतील. नवोदित कलाकारांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होईल.

तूळ
जमीन खरेदी विक्रीचे काही व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना किचकट विषयातही गोडी निर्माण होईल. गृहिणींना तर आज अजिबात उसंत मिळणार नाही.

वृश्चिक
आजचा दिवस धावपळीचा आहे. तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असाल तर सह्या करण्यापूर्वी मजकूर नीट वाचून घ्या.

धनु
आज तुमची मिळकत उत्तम असेल. गृहिणींना अचानक येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल. आज प्रवास त्रासदायक होऊ शकतात फार अर्जंट नसतील तर टाळा.

मकर
कमी श्रमात जास्त लाभाच्या अपेक्षेने निराशाच पदरात पडू शकेल. महत्त्वाचे निर्णय विचारांती घ्या. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेले असलेले महत्त्वाचे असतील.

कुंभ
आज मीपणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. गोड बोलून बरीच अवघड कामे सोपी होतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.

मीन
आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसृष्टीने अनुकूल आहे. आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मकतेने पार पडतील. जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.