आटपाडीत आज आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन!

पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या एसटी आरक्षण प्रवर्गातून अंमलबजावणीसाठी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी समस्त धनगर समाजाला रस्त्यावर उतरून रास्ता रोको करण्याचे आवाहन केले होते त्याच अनुषंगाने आटपाडी तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने दि. २३ सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन बाजार समितीचे माजी संचालक विष्णू अर्जुन यांनी तहसीलदार सागर ढवळे यांना दिले आहे.

या निवेदनामध्ये म्हटले आहे की, गेले १२ दिवसापासून धनगर समाजबांधव पंढरपूर येथे आरक्षणाच्या लढाईसाठी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या विविध मागण्या आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी व धनगर एसटी आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी होण्यासाठी आटपाडी येथील आण्णा भाऊ साठे चौक येथे सोमवार दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.