आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदार संघामध्ये प्रत्येक पक्षातील उमेदवारी याद्या प्रसिद्ध होत आहेत. तसेच मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज देखील दाखल होत आहेत. अशातच हातकणंगले विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसला ही जागा सोडली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस मधून राजूबाबा आवळे यांना तिकीट जाहीर करण्यात आल्याने नाराज असलेले शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी बंडाचा झेंडा हातात घेऊन रिंगणात उतरण्याची तयारी केलेली आहे. यामुळे सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती येथे होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसपुस सुरू आहे. आता शिंदे शिवसेनेच्या अंतर्गत निशाण्यावर कोण? आणि जाधव, मिणचेकर यांचे मनोमिलन करणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
