आटपाडी तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचा शिवसेना (शिंदे गट) यांना जाहिर पाठिंबा 

स्व. भाऊ बाबर यांनी खानपुर – आटपाडी मतदार संघांसाठी अशक्य होते ते शक्य केले. दुष्काळी भागात पाणी आल्यामुळे खानापुर – आटपाडी विधानसभा मधील शेतकरी सुखी आणि समृद्ध झाले आहेत. बहुचर्चित व आनेक वर्ष दुष्काळी भागाचा रखडलेला प्रकल्प जलनायक टेंभू योजनेचे जनक स्वर्गीय अनिल (भाऊ) बाबर यांनी पूर्ण करून मतदारसंघांमध्ये पाणी आणले स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी जनतेला शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करण्यात खऱ्या अर्थाने महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. सुहास (भय्या) बाबर आज यशस्वी झाले आहेत त्यामुळे आज भाजपा चे माजी.

महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वैद्यकीय वी. आघाडी तसेच सांगली जिल्हा समन्वयक पदवीधर प्रकोष्ठ चे डॉ. प्रशांत संजय देशमुख, यांनी भारतीय जनता पक्ष आटपाडी तून संपूर्ण ताकतीने महायुती चे उमेदवार आमदार करण्यासाठी मा. सुहास (भय्या) बाबर यांच्या पाठीशी संपूर्ण भाजप आहे व त्यांना आटपाडी तून जाहीर पाठिंबा दिला त्यावेळी उपास्थित रणधीर (भय्या) देशमुख, वरदविनायक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल शिंदे सूरज पाटील, रणजित मोहिते, सागर पाटील, अतुल शिंदे, डॉ राजेश बाबर आदी मान्यवर होते.