दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! कसं पहाल टाईम टेबल!

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयसीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा १२ फेब्रुवारी ते ३ मार्च, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत होणार आहे.

२०२४च्या परीक्षेपासून उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्याची नवी सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, कम्पार्टमेंट परीक्षा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सीआयसीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावीच्या परीक्षेत कला विषयाची परीक्षा वगळता अन्य विषयांच्या परीक्षा सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होणार आहेत. कला विषयाची परीक्षा सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत घेतली जाणार आहे. तर बारावीच्या सर्व विषयांची परीक्षा दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकासह परीक्षेबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ICSE आणि ISC बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक कसे कराल डाऊनलोड?

  • अधिकृत वेबसाईट cisce.org ला भेट द्या.
  • होमपेजवर “Notice Board”सेक्शन वर क्लिक करा. आता नोटीस बोर्ड वर “Time Table of ICSE Year 2024 Examination” (दहावी साठी) आणि “Time Table of ISC Year 2024 Examination”(बारावी साठी) आहे त्यावर क्लिक करा.
  • लिंक वर क्लिक केल्यानंतर वेळापत्रक समोर येईल. ते डाऊनलोड करण्याची देखील सोय आहे.

आता वेळापत्रक जारी झाल्यानंतर परीक्षेपूर्वी बोर्डाकडून अशाचप्रकारे अधिककृत वेबसाईट वर अ‍ॅडमीट कार्ड्स देखील जारी केली जातील. परीक्षेला जाताना ही अ‍ॅडमीट कार्ड्स घेऊन जाणं आवश्यक आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना त्याचे अपडेट्स देखील cisce.org वर पाहता येणार आहेत.

विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी 15 मिनिटं अधिकची ही फक्त पेपर वाचायला दिली जातात. 10.45 ला पेपर वाटायला सुरूवात केली जाते. पेपर लिहायला सुरूवात 11 वाजता केली जाईल.