Cocktail 2 : सैफ आणि दीपिकाच्या जागी शाहिद आणि क्रितीची रिप्लेसमेंट; १२ वर्षांनंतर बनणार चित्रपटाचा सिक्वेल! रश्मिका मंदान्ना….

बॉलीवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि पतौडी नवाब सैफ अली खानचा ‘कॉकटेल’ चित्रपट नवदिच्या काळातील तरुणांसाठी विशेष आवडता चित्रपट आहे. या चित्रपटात लव्ह ट्रँगल दाखवण्यात आला होता.या चित्रपटातील गाण्यांचीही खूप चर्चा झाली होती.

आता १२ वर्षांनंतर दिग्दर्शक होमी अदजानिया ‘कॉलटेल’चा सिक्वेल बनवणार आहे. पण या चित्रपटात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण नाही तर शाहिद कपूर आणि क्रिती सॅनन एकत्र काम करताना दिसणार आहेत.माहितीनुसार, ‘कॉकटेल’ नंतर दिनेश विजन ‘कॉकटेल 2’ची निर्मिती करणार झाला आहे. मात्र, यावेळी चित्रपटात बदल पाहायला मिळणार आहेत.

पण मागील चित्रपटाप्रमाणे या चित्रपटातही लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार असून शाहीद कपूर आणि क्रिती सॅननसह या चित्रपटात रश्मिका मंदान्ना देखील दिसणार असल्याचे वृत्त आहे.२०१२ मध्ये ‘कॉकटेल’ रिलीज झाला तेव्हा हा चित्रपट दीपिका पदुकोणसाठी गेम चेंजर ठरला. या चित्रपटानंतर तिच्या करिअरचा ड्रफ वाढतच गेला.

या चित्रपटाची कथा इम्तियाज अली यांनी लिहिली होती. या चित्रपटात एक प्लेबॉय, फोटोग्राफर आणि एक रूढीवादी मुलची प्रेम कथा दाखवण्यात आली होती. माहितीनुसार, सध्या ‘कॉकटेल 2’ साठी कास्टिंग चालू आहे आणि मे 2025 मध्ये हा चित्रपट रिलीज होऊ शकते.