इचलकरंजीत शहापूर प्रीमियर लीग स्पर्धा उत्साहात संपन्न….

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. याला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग देखील मिळतो. वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजू कबाडे युवाशक्तीच्या माध्यमातून गेली दहा दिवस शहापूर येथील छत्रपती क्रीडासंकुलामध्ये सुरू असणारी शहापूर प्रीमियर लीग हाफ पीच नाईट क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण आ.डॉ.राहुल आवाडे, शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले, सन्मती बँकेचे चेअरमन सुनील पाटील व चौंडेश्वरी सूतगिरणीचे चेअरमन संजय कांबळे यांच्या हस्ते तसेच राजू कबाडे, रणजीत अनुसे, इस्माईल शेख, रतन वाझे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. सदरच्या स्पर्धेमध्ये संतोष भाटले यांचा समर्थकॉलनी रॉयल्स हा संघ विजेता ठरला. ही स्पर्धा एकूण आठ संघांच्या मध्ये खेळवली गेली होती. यावेळी संतोष काळगे, सुनील भोने, राहुल पाटील, अशोक वाझे, नितीन सुतार, बालाजी हुल्लेम णी, मयूर लांडगे आदी उपस्थित होते.