आनंद झाल्यावर पत्नी करायची अजब हट्ट, दुसऱ्या पतीलाही जमले नाही, अखेर…तपासानंतर पोलीस झाले सुन्नं

माणसाचा स्वभावाला औषध नसते. अनेकांचे स्वभाव एकदम विचित्र असतात. असाच एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. एका दाम्पत्यात पत्नीच्या अजब सवयीने वारंवार दोघात वारंवार खटके उडायचे. त्यामुळे पतीला तिचे हे नखरे पूर्ण करणे जीवावर आले होते. पहिल्या पतीने तर कंटाळून जगच सोडले होते. अखेर तिच्या दुसऱ्या पतीच्या गळ्यात ही ब्याद आल्याची दुसऱ्या पतीची भावना झाली आणि एका रात्री त्याने दगडाने तिचे तोंड आणि चेहरा चेचून काढला आणि घटना स्थळावरुन तो पसार झाला….पोलिसांना जेव्हा या प्रकरणातला गुंता समजला तेव्हा ते देखील हैराण झाले…..

एक महिला आनंद झाल्यानंतर अजब जिद्द करायची. तिच्या या हट्टापुढे कोणाचेही काही चालायचे नाही. जेव्हा ती खूष व्हायची तेव्हा तिचा पती मात्र संतापायचा…त्याच्या चेहऱ्यांचा रंग उडायचा…महिलेचा पहिला पतीतर बिचारा वारला. परंतू दुसरा पती देखील तिची जिद्द पूर्ण करु शकला नाही. तो आपल्या पत्नीपासून नेहमीच वैतागलेला होता. जेव्हा या प्रकरणाचा गुंता सुटला तेव्हा पोलिसांचे टाळकं सटकलं. चला तर पाहूयात काय आहे प्रकरण….

मध्य प्रदेशच्या अनुपपूर जिल्ह्यातील महिले सोबत अजब घटना घडली आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोट भलमूडी गावाच्या जवळ ४० वर्षांच्या महिलेचा मृतदेह सापडला आहे.या महिलेचे नाव सेंमवती बैगा उर्फ डहरीयाईन असे असल्याचे उघडकीस आले आहे. जंगलातील भागात तिचा मृतदेह सापडल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांचे पथक घटना स्थळी पोहचले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला. तपासात महिलेचे नेहमी पतीशी भांडण व्हायचे असे उघडकीस आले.त्या रात्री देखील पतीचे तिच्याशी कडाक्याचे भांडण झाले होते.

रामनगर ठाण्याच्या हद्दीतील वार्ड नंबर-15च्या छोटी भलमूडी गावाच्या जवळील जंगलातून एका ४० वर्षीय महिला सेंमवती बॅगा उर्फ डहरीयाईन हीची हत्या तिचा दुसरा पती हीरा सिंह गौंड याने केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी बेलिया ठाणे हद्दीतील बिजुरी गावाचा रहीवासी आहे. परंतू अलिकडे तो छोटी भलमूडी ठाणे – रामनगरात रहात होता.

तेव्हा घरी यायची नाही…

या महिलेला दारुचे व्यसन होते. ती नेहमी दारु जिथे प्यायची तेथेच झोपी जायची. त्यामुळे पती आणि तिच्यात भांडणे होत होती. तसेच पतीला तिच्या चारित्र्यावर देखील संशय होता. कारण ही महिला कोणाच्या घरी दारु प्यायची तेव्हा घरी यायची नाही. घटनेच्या दिवशी देखील असेच घडले. त्यामुळे पती प्रचंड चिडला आणि त्या्ने दगडाने तिची खांडोळी केली आणि तिला ठार केले. पती हिरा सिंग याला जंगलातून अटक केली असून त्याने रामनगर पोलिसांना पत्नीच्या खुनाची कबुली दिली आहे.