आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे किरकोळ कारणावरून एकाच बेदम मारहाण करण्यात आली आहे. याबाबत राजेवाडी येथील दोघांवर आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला नोंद झाला आहे. याबाबत पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, दि.१३/०३ /२०२५ रोजी रात्री ०९. ३० वा. राजेवाडी येथील राज हॉटेल समोर ठिकाणी यातील फिर्यादी बिभीषण महादेव शिरकांडे थांबले असताना आरोपी अमोल किसन शिरकांडे व गणेश किसन शिरकांडे दोन्ही रा. राजेवाडी हे त्यांची स्विफ्ट गाडी एम एच १२ बी डब्ल्यू ४१९३ या गाडीमधून त्या ठिकाणी येऊन फिर्यादीस तू आमच्या वडिलांना अरेरावी का करतोस आणि तू आमच्या शेतातून ट्रॅक्टर का नेला असे म्हणून शिवीगाळ करून गणेश कारंडे यांनी त्याच्या हातातील लाकडी बॅटने फिर्यादीचे पाठीवर व गुडघ्यावर मारून व अमोल शिरकांडे याने त्याचे हातातील लोखंडी गज फिर्यादीचे उजव्या व डावे हाताच्या कोपरावर मारून फिर्यादीत जखमी करून लथा बुक्क्यांनी मारहाण केले आहे व फिर्यादीचा मोबाईल फोडून नुकसान केले आहे म्हणून आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. पुढील अधिक तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.
आटपाडी तालुक्यातील राजेवाडीत एकास लोखंडी रॉड व बॅटने मारहाण
