सांगोला तालुक्यातील करांडेवाडी येथे घडलेली ही घटना अतिशय धक्कादायक असून, एका मुलाने आपल्या वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची नोंद सांगोला पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. कुटुंबातील वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले असून, वडील गणपती गळवे यांनी स्वत:च्या मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हि घटना करांडेवाडी येथे घडली आहे. मुलाने वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. वडील गणपती भोजलिंग गळवे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
गणपती गळवे आपल्या पत्नीशी मोठा मुलगा नवनाथ याच्या वागणुकीबाबत चर्चा करत होते. ही चर्चा ऐकून नवनाथने रागाने वडिलांना शिवीगाळ व धमकी दिली. त्यानंतर कुऱ्हाडीच्या दांड्याने वडिलांच्या पाठीवर, हातावर व मांडीवर मारहाण केली. नवनाथने पुन्हा बदनामी केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. वडिलांच्या आरडाओरडीनंतर लहान भाऊ भागुजी गळवे यांनी हस्तक्षेप करून नवनाथला रोखले. हल्ल्यात जखमी झाल्यानंतर गणपती गळवे यांनी सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले.उपचारानंतर त्यांनी सांगोला पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली
