पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ वडगावात सर्वपक्षीय कँडल मार्च

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आम. डॉ. अशोकराव माने यांच्या नेतृत्वाखाली पेठ वडगाव (Vadgaon) येथे सर्वपक्षीय कँडल मार्च काढण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जाऊन नगरपालिका चौक येथे कँडल मोर्चची सांगता झाली. आम. डॉ. अशोकराव माने म्हणाले, यापूर्वीही पाकिस्तानच्या असल्या कुरापतींना भारताने जशास तसे उत्तर दिले आहे .

भारताच्या इतिहासामध्ये सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्कीच योग्य अॅक्शन घेवून अतिरेक्यांना व त्यांच्या सुत्रधारांना धडा शिकवतील. यावेळी उपस्थितानी मौन पाळुन हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. मोहनलाल माळी, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष आप्पा माने, शहराध्यक्ष जगन्नाथ माने, संतोष लडगे, अमोल हुक्केरी, वैभव हिरवे, जवाहर सलगर, सुहास राजमाने, तय्यब कुरेशी, नागेश नरंदेकर, मानसिंग चव्हाण, शरद बेनाडे, युवराज शहा, संभाजी बन्ने, संजय सुर्यवंशी, सलीम मुल्लाणी, युवराज वाळवेकर, नितीन चव्हाण, जिनेंद्र देसाई, बानु नदाफ, गितांजली राजमाने, सुरेखा सुर्यवंशी तसेच हिंदुत्वावादी संघटना, विविध पक्षाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.