सांगोला तालुक्यातील एकूण जलसंपदा विभागाकडील प्रकल्प संख्या , सिंचन क्षेत्रांची गरज व येथील जलसंपदा विभागांशी संबंधित समस्यांचे निराकरण तात्काळ करून स्थानिक पातळीवर जलसंपदा प्रकल्पांचे प्रभावी व्यवस्थापन व्हावे, यासाठी जलसिंचन विभागाचे क्षेत्रीय कार्यालय सांगोल्यात स्थापन करण्याची पत्राद्वारे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली असून सदरचे कार्यालय लवकरच सुरु होणार असल्याची माहिती आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
सांगोला तालुक्यातील क्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रशासकीय सध्या सिंचन , पाणीपुरवठा विभागाशी संबंधित कामांसाठी दूरवरच्या कार्यालयात जावे लागते, ज्यामुळे वेळ आणि खर्च वाढतो . जर जलसंपदा विभागाचे क्षेत्रीय कार्यालय सांगोल्यात झाले. तर जलसंपदा प्रकल्पांचे स्थानिक पातळीवर नियोजन व अंलबजावणी करणे , सिंचन, पाणीपुरवठा सासंबंधी असणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण करणे तसेच स्थानिक शेतकरी आणि नागरिकांना तांत्रिक व प्रशासकीय सहाय्य त्वरित उपलब्ध होणार आहे. शिवाय सांगोला तालुक्यात २० को. प . बंधारे व १४ लघु पाटबंधारे तलाव या प्रकल्पांचे देखभाल दुरुस्थी या सिंचन व्यवस्थपनाचे कामकाज करणे देखील सोयीचे होणार आहे. त्यामुळे सांगोल्यामध्ये जलसंपदा विभागाचे विभागीय कार्यालय व्हावे अशी मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे केली होती . यावर ना. विखे -पाटील यांनी संबंधित विभागास सूचना देत लवकरात लवकर क्षेत्रीय कार्यालय सांगोला येथे सुरु करण्याबाबत अंलबजावणी करण्याचे आदेश दिले असल्याचे आमदार डॉ. देशमुख यांनी सांगीतले
