या भरती प्रक्रियेअंतर्गत ज्युनिअर श्रेणी अधिकारी -४४ पदे, असोसिएट -५० पदे, टंकलेखक -९ पदे, वाहनचालक -६ पदे तर शिपायाची -५८ पदे भरली जाणार आहेत. एकूण १६७ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहेत. कोणत्याही शाखेचे पदवीधर आणि मराठी भाषा घेऊन दहावी उत्तीर्ण उमेदवारच यासाठी पात्र असणार आहेत. टायपिंग पदासाठी उमेदवाराकडे संगणक कौशल्य टायपिंक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
बँकेत नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार महाराष्ट्र बँकेचे (Maharashtra Bank) अधिकृत संकेतस्थळ msbbank.com वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ६ ऑगस्ट २०२५ पर्यंत देण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेअंतर्गत ज्युनिअर श्रेणी अधिकारी -४४ पदे, असोसिएट -५० पदे, टंकलेखक -९ पदे, वाहनचालक -६ पदे तर शिपायाची -५८ पदे भरली जाणार आहेत. एकूण १६७ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहेत. कोणत्याही शाखेचे पदवीधर आणि मराठी भाषा घेऊन दहावी उत्तीर्ण उमेदवारच यासाठी पात्र असणार आहेत. टायपिंग पदासाठी उमेदवाराकडे संगणक कौशल्य टायपिंक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
टायपिंग आणि कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी उमेदवाराचे वय १ जून २०२५ रोजी १८ ते ३२ या दरम्यान असणे आवश्यक आहे. ज्युनिअर श्रेणी अधिकारी पदाचा अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना १ हजार ७७० रुपये तर इतर सर्व पदांसाठी ११८० रुपये एवढा परीक्षा शुल्का आकारण्यात आला आहे. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि फोटो अपलोड करणे बंधनकारक असल्याचे जाहिरातीमध्ये सांगण्यात आले आहे.