आत्मनिर्भय भारतासाठी वित्तीय साक्षरता महत्वाची ठरेल

खानापूर, सर्व युवा वर्गाने आर्थिक साक्षर होणे गरजेचे आहे, स्वतः जवळील पैसा भविष्यकाळासाठी कसा फायद्याचा ठरेल याकडे विशेष लक्ष द्यावे . पैसा बचत बरोबरच योग्य गुंवणूक महत्वाची आहे. गुतवणुकीच्या विविध क्षेत्रात पैसा गुंतवून कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण आपली जबाबदारी आहे हाच आत्मनिर्भर भारताचा पाय आहे, असे प्रतिपादन सेबीचे स्मार्ट गुंतवणूक तज्ज्ञ् अमेय वझे यांनी केले.

ते श्री संपतराव माने महाविद्यालयात सीजीएसआय मुंबई , अर्थशास्त्र विभाग , एनएसएस विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्राहकांचे अधिकार आणि वित्तीय साक्षरता ‘ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेत बोलत होते. कार्यशाळेच्या प्रारंभी संस्थापक अध्यक्ष माजी आमदार स्व. संपतराव (नाना ) माने यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

दुसऱ्या सत्रातील प्रमुख सीजीआयचे तज्ज्ञ् टी . आर. पांडे म्हणाले , जेंव्हा आपण एखादी वस्तू पैसे देऊन खरेदी करतो,तेंव्हा ती वस्तू चांगली व टिकाऊ असली पाहिजे,असे प्ररेकांचे मत असते . मात्र आपली फसवणूक जर होत असेल तर ग्राहकांनी आवाज उठवला पाहिजे. यासाठी जिल्हा, राज्य पातळीवर ग्राहक मंच असून तेथे ग्राहकांनी आपली तक्रार नोंदवावी प्राचार्य डॉ. जहांगीर मुलाणी म्हणाले, आयुष्य जगताना भविष्य काळ चांगला व सुखाचा जावा , यासाठी पैशाचा विनियोग सुयोग्य करावा. प्रास्ताविक डॉ नितिन बाबर, प्रा. सचिन जाधव यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. दि.के. गोडसे यांनी केले. यावेळी सर्व प्राध्यापक, विध्यार्थी- विद्यार्थिनी ,पालक उपस्थित होते.