पाचगाव उपसरपंचपदी दीपाली गाडगीळ

पट्टणकोडोली, पाचगाव (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दीपाली प्रकाश गाडगीळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये झालेल्या सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रियंका पाटील या होत्या.

 या पदासाठी दीपाली गाडगीळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी अजित राणे यांनी काम पाहिले. यावेळी गावातील विविध सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत सदस्य अतुल गवळी, संग्राम पोवाळकर, संजय शिंदे, सचिन पाटील, अभिजीत पौंडकर, विलास पाटील, अमित कदम, अश्विनी चिले, रोमा नलवडे, पोर्णिमा कांबळे, नारायण गाडगीळ, संजय पाटील, शिवाजी ढेरे यांच्यासह अन्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. या निवडीनंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दीपाली गाडगीळ यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले