स्वतंत्रपूर खुल्या वसाहतीत वृक्षरोपण

पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड गरजेची आहे. स्वतंत्रपूर(Swatantrapur) खुल्या वसाहतीतील कैदी बांधवानी या हरित मोहिमेतून समाजाशी नव्याने नाळ जोडण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमामुळे आटपाडी तालुक्याला हिरवाईची नवी ओळख मिळेल , अशा शब्दांत जात विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी समाधान व्यक्त केले.

आटपाडी तालुक्यातील स्वतंत्रपूर खुल्या वसाहतीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नारळ व बांबूच्या रोपांची लागवड करून आमदार पडळकर यांच्या हस्ते या हरित मोहिमेचा प्रारंभ झाला. वसाहतीतील ५४ एकर क्षेत्र वृक्ष लागवडीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभाग व तुरुंग अधिकारी मधुकर चौधरी यांच्या संकल्पातून तब्बल १६ हजार झाडांची लागवड येथे होत आहे, आंबा , नारळ, चिंच, पिंपळ , कडुलिंब , बांबू यांसारखी उपयुक्त झाडे लावून परिसराला हिरवाईचे वरदान मिळणार आहे.