ध्वनिप्रदूषणात प्रचंड भर टाकणाऱ्या व आरोग्यास अपायकारक असणाऱ्या डॉल्बी व लेसर शो करण्यावर चालू वर्षी प्रशासनाकडून मनाई आदेश असताना, बेकायदेशीरपणे डॉल्बी व लेसर शो करणाऱ्या ४ जणांवर सांगोला पोलिसांनी कारवाई केली. मौजे घेरडी येथील मुख्य चौकात सार्वजनिक रस्त्यावर मिरवणूक काढून, मिरवणुकीमध्ये बेकायदेशीर डॉल्बी सिस्टम व लेसर शो चा वापर करुन डॉल्बी वाजवत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस हे मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी पोहोचले. त्यांना बेकायदेशीर डॉल्बी व लेसर शो सुरू असल्याचे दिसल्याने डॉल्बीधारक विशाल निळे (रा. पारे ता. सांगोला), सौरभ खामकर (रा. नारायणगाव, ता. शिरुर जि. पुणे), संकेंत ढवळे (रा. मंगळवेढा), अमोल दामाजी पाटील (रा. कुंभारी ता. जत जि. सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल नोंदवला.
डॉल्बी व लेसर शो ; चौघांजणांवर कारवाई
