मुंबई व मुंबई उपनगरात लोकसंख्या वाढत आहे. शहरातील गर्दी वाढत असताना अनेकजण मुंबईच्या वेशीवर म्हणजे मीरा रोड, भाईंदर, वसई-विरार येथे स्थायिक झाले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांवरात या शहरांवरही ताण यायला लागला आहे. त्यामुळं आता शहरीकरण वाढत आहे. पालघर जिल्ह्यातही आता मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढत चालले आहे. त्यामुळं लोकलचा विस्तारही आता पालघरपर्यंत झाला आहे. पालघरहून हजारो लोक मुंबईत नोकरीसाठी येतात. त्यामुळं पालघर-चर्चेगट रेल्वेमार्गावरील गर्दीही वाढत आहे. याच गर्दीवर तोडगा काढण्यासाठी पश्चिम रेल्वेवर नवीन मार्गिका उभारण्यात येत आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वे मार्गावर आणखी सात स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) माध्यमातून सुरू असलेल्या विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहेत. हा मार्ग 64 किमीचा आहे. या रेल्वेमार्गावर सात स्थानके उभारण्यात येणार आहे. एकाच प्रकल्पांतर्गत शहराच्या रेल्वे नेटवर्कमध्ये इतकी स्थानके जोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. एमआरव्हीसीचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पासाठी 3578 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. जून 2027पर्यंत हा रेल्वे मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे.
विरार-डहाणू रेल्वेमार्गावर सध्या नऊ स्थानके आहेत. विरार, वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर उमरोली, बोईसर, वाणगाव आणि डहाणू रोड अशी स्थानके आहे. या दरम्यान आणखी सात स्थानकांची आणखी करण्यात येणार आहे. दरम्यान विरार रेल्वेमार्गावर सध्या अतिरिक्त ताण आहे. सध्या विरारहून 5.8 लाख प्रवासी प्रवास करतात. तर डहाणूवरुन 2.6 लाख नागरिक प्रवास करतात. वैतरणा आणि बोईसरसारख्या छोट्या स्थानकातून हजारो नागरिक प्रवास करतात.
संभाव्य स्थानकांची नावे
वाढिव,सरतोडी,माकुणसार,चिंचपाडा,पंचाळी,वंजारवाडा, BSES कॉलनी
या नव्या मार्गिकांमुळं हे. विरार ते डहाणू आणि चर्चगेट ते डहाणूदरम्यान सेवांची वाढ करण्यास मदत होणार आहे. सध्या चर्चगेट ते डहाणूदरम्यान दिवसभरात 6 ते 7 थेट गाड्या धावतात. चौपदरीकरणामुळे विरार-डहाणू दरम्यानच्या सेवा, तसेच संपूर्ण मार्गावर 200 पेक्षा अधिक सेवा चालवल्या जाऊ शकतात. सध्या विरार, वैतरणा, सफाळे, केळवे रोड, डहाणू रोड आणि उमरोली स्थानकांसह पुलांवर स्टेशन इमारतींचे बांधकाम सुरू आहे.
