आशिया चषक खेळून काय साध्य केले ?

इचलकरंजी, पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदूस्थानच्या सैनिकांनी ऑपरेशन सिंदर यशस्वी करून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर आशिया कप क्रिकेट खेळून काय साध्य केले? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला एमआयएमचे असदुद्दीन ओवैशी यांनी केला. तर इचलकरंजी, कोल्हापूर, आजरा व कुरूंदवाड या ठिकाणी पक्षाच्यावतीने निवडणूक लढविणार असल्याची त्यांनी घोषणा केली.

 ऑल इंडिया मजलीस- ए- इत्तेहाद- ऊल- मुस्लिमीन (एआयएमआयएम) यांच्यावतीने यशोलक्ष्मी मैदानावर आयोजीत केलेल्या जाहीर सभेत ओवैसी बोलत होते. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. तेव्हा राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करावी असे आवाहन केले. छ. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज व महात्मा जोतिबा फुलेंच्या भूमीत कोणालाही आडवू शकत नाही. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार आपण आपले विचार संपूर्ण देशात कोठेही मांडू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
ओवैसींचा मोदी सरकारवर खडा सवाल
 
 एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खास. इम्तियाज जलील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार आपल्याला आपल्या धर्माप्रमाणे पुजा-अर्चा करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्याला काही मंडळी राजकारणासाठी विरोध करीत आहेत. पैंगबर मोहमद यांच्या बॅनरवरून विरोध केला जात आहे. त्यामध्ये जाती समाजात तेढ निर्माण करणाऱ्या मंडळीविरोधात आपण एकत्र येण्याचे आवाहन केले..

 यावेळी पक्षाचे पदाधिकारी इम्रान सनदी, फय्याज शेख, शफीऊल्ला काजी, साजिश समीर बिल्डर आदीनी मनोगत व्यक्त केले. सभेला महिला, पुरूष मोठ्या संख्येने हजर होते.