अनेक महिलांना आपल्या देखील चेहऱ्यावर ग्लो यावं, आपण सुंदर दिसावं असं वाटतं. पण, अनेकदा केमिकलयुक्त क्रिम लावूनही आपल्याला हवा तसा परिणाम मिळत नाही. अशा वेळी तुम्ही घरच्या घरी काही सोप्या टिप्स वापरु शकता. ज्यांच्या चेहऱ्यावर खूप डाग असतात ते रिमूव्ह करायला खूप कठीण असते. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.शिवाय असे खूप लोक आहेत जे केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरतात. जर तुम्हाला सुंदर दिसायचं असेल तर तुम्ही केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी ही पेस्ट नक्कीच चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी घरच्या घरी उपलब्ध असलेले सोपे पर्याय जसे की, बेसन, हळद, मुलतानी माती, तांदळाचं पीठ, संत्र्याच्या सालीची पावडर तसेच, दुधाचा वापर तुम्ही करु शकता. ही पेस्ट तयार करण्यासाठी सर्वात आधी एका वाटीत दोन चमचे बेसन आणि चिमूटभर हळद घालून त्याचे मिश्रण करून घ्या. मिश्रण तयार केल्यानंतर, त्यात दूध किंवा दही घाला आणि सॉफ्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट तयार होताच तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटं चेहरा सुकू द्या. ही पेस्ट सुकल्यानंतर तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल.
चेहऱ्यावर नैसर्गित ग्लो हवाय? मग, घरच्या घरी करा ‘हा’ सोपा उपाय
