कुंभोज, कुंभोज, दानोळी रोडवर असणाऱ्या शिंदेवाले, पांडव, कोळी, घोदे, पोहेकर, कुंडले, यांच्या शेती परिसरामध्ये मागील बिबट्याचा वावर आहे. जवळपास एक महिन्यापासून बिबट्याचा वावर आहे.
१६ सप्टेंबर रोजी पोहेकर यांच्या गोठ्यावरील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये बिबट्या काय झाला होता. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी करून निरीक्षण केले होते. त्यानंतर सोमवार दिनांक २९ रोजी पुन्हा बिबट्या म्हशी चारण्यासाठी गेलेल्या प्रथमेश कुंडले या शेतकऱ्यास निदर्शनास आला. सदर ठिकाणी कुंडले यांना खूप सारे हाडांचे सापळे दिसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली व त्यांनी इकडे तिकडे पाहिले असता, म्हशींच्या पलीकडच्या बाजूला बिबट्या बसला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जीव वाचवण्यासाठी त्यांनी तेथून पळ काढला. वारंवार सदर परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाच्या अधिकारी मंगेश वंजारी सदर ठिकाणी गस्त घालत असताना त्या सायंकाळी त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. पुढील कारवाईसाठी त्यांनी ड्रोन वगैरे बोलवून घेऊन खात्री करून घेतली. अशा सर्व घटनेमुळे, परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत करवीर वनक्षेत्रपाल नंदकुमार नलावडे यांच्याकडे सदर बिबट्याला जर बंद करावे, सदर बिबट्यापासून नागरिकांना होणारा धोका टाळावा, अशा आशियाचे निवेदन दिले. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी नंदकुमार नलावडे, श्री कांबळे, मंगेश वंजारी व त्यांच्या सर्व टीमने प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले.यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
