खानापूर,येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्रपूजन

खानापूर , येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्रपूजन झाले. यावेळी विटा तालुका कार्यवाहक संजय माधवराव मोहिते उपस्थित होते. मोहिते यांनी संघाच्या शंभर वर्षातील कार्याचा गौरव व समाजसेवेतील योगदानाची माहिती दिली.प्रमुख पाहुणे आदर्श शिक्षक अगस्ति विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष तुकाराम नाईक यांनी संघाबद्दलची माहिती सांगितली. डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांनी संघ राबवीत असलेल्या समरसता , कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, नागरी शिष्टाचार, स्वबोध या पंच परिवर्तनाची माहिती दिली. ते म्हणाले, प्रत्येकाने जातपात विसरून हिंदू ही एकच जात व धर्म म्हणून एकत्र यावे प्रत्येकाने पर्यावरण रक्षण व संवर्धनाची जबाबदारी पार पाडावी. संघ प्रचारक शिवप्रसाद क्षेडे यांनी प्रास्ताविक केले. भवानीपूर मंडल प्रमुख प्रकाश जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी विराज माने, परशुराम हसबे, रणधीर टिंगरे, डॉ. वैशाली हजारे,राहुल टिंगरे, डॉ. बसवराज मनकवडा उपस्थित होते.