ऐश्वर्या-अभिषेकने एआय आणि डीपफेकविरोधात हायकोर्टात तक्रार

बॉलिवूडचे दिग्गज कुटुंब, बच्चन परिवार, एआय आणि डीपफेक तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाविरुद्ध आता मोठ्या प्रमाणावर पाऊल उचलत आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा समावेश आहे. अलीकडेच ऐश्वर्या आणि अभिषेकने दिल्ली हायकोर्टात गूगल आणि यूट्यूबवर 4 कोटी रुपये मूल्याचा दावा दाखल केला आहे. या दाव्यात त्यांनी आरोप केला आहे की या प्लॅटफॉर्म्सवर त्यांच्या फोटोंचा आणि व्हिडिओंचा एआय आणि डीपफेकच्या माध्यमातून गैरवापर केला जात आहे.

त्यांच्या या तक्रारीत म्हटले आहे की, एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी याप्रकारचा कंटेंट वापरण्यात येतो, ज्यामुळे कलाकारांच्या प्रतिमांचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. फाईलिंगमध्ये म्हटले आहे, ‘एआय प्लॅटफॉर्मला असे कंटेंट प्रशिक्षणासाठी दिले जाते ज्यामुळे कलाकारांना निगेटिव्ह रीतीने दाखवले जाते आणि त्यांचे अधिकार मोडले जातात. परिणामी, अशा चुकीच्या माहितीचा प्रसार अधिक वाढतो असं तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

अभिषेक-ऐश्वर्या यांनी असेही नमूद केले की, हे कंटेंट यूट्यूबवर अपलोड होतात. लोक पाहतात आणि नंतर ट्रेनिंगसाठी वापरले जातात. त्यामुळे अशा गैरवापराची घटना अनेक पटीने वाढू शकते.

कलाकारांच्या आधीच्या तक्रारी संबंधित
याबाबत याआधी देखील अमिताभ बच्चन, अनिल कपूर आणि जैकी श्रॉफसारख्या कलाकारांनी आधीच उचलले आहे. जे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक अधिकारांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी केले आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, कलाकारांनी यूट्यूबच्या धोरणांबाबतही चिंता व्यक्त केली आहे आणि म्हटले आहे की थर्ड पार्टी कंटेंट आणि प्लॅटफॉर्मवरील नियम चिंताजनक आहेत.