नवनियुक्त प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतरांचे रखडले वेतन !

इस्लामपूर : यावर्षीच्या एप्रिल महिन्यापासून नव्याने सेवेत रुजू झालेल्या नवनियुक्त प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर केंद्र कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनाचा नवा प्रश्न पुढे आला आहे. राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या १६ एप्रिल २०२५ च्या परिपत्रकामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दिवाळीपूर्वी होणार का ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

राज्यातील मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, औरंगाबाद, जळगाव, अमरावती व नागपूर विभागातील विभागीय सहसंचालक उन्य शिक्षण शिक्षण हे नव्याने प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे पद निर्मिती झाल्यास सहसंचालकांच्या लॉगिनमधून त्यांचे नाव एच टी ई सेवार्थ प्रणालीमध्ये घेऊन त्यांचा पगार सुरू करत असत. मात्र शासनाच्या उन्य व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक १६ एप्रिल २०२५ च्या परिपत्रकामुळे एप्रिल महिन्यापासून आज अखेर जे नवनियुक्त प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. त्यांचे पगार मे – जूनपासून आजअखेर झालेले नाहीत. त्यांना वाढीव महागाई भत्तासुद्धा मिळालेला नाही. वरील परिपत्रकाप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव सहसंचालक कार्यालयाकडून संचालक उच्च शिक्षण कार्यालय, पुणे तिथून मंत्रालय, मुंबई असा प्रवास करून यांचे पगार दिवाळीत तर होणार का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे ग्या कर्मचाऱ्यांचे वय ६० वर्षे झालेले नाही, त्यांचे पूर्वीचे एचटीई सेवार्थमध्ये नाव आहे. त्यांनासुद्धा पगारापासून वंचित राहावे लागत आहे. याची शासनाने दखल घेऊन लवकरात लवकर प्रस्ताव मंजूर करून या कर्मचायांचे पगार दिवाळीपूर्वी व्हावेतः याकरता शासन, संचालकसो पुणे व सहसंचालक यांनी योग्य ती पावले उचलावीत व दिवाळीपूर्वी सदर कर्मचाऱ्यांचे पगार करावेत अशी मागणी होत आहे.