विटा येथे दि. १० ते १३ ऑक्टोबर या काळात ‘शोभा ग्रामीण महोत्सव २०२५ दीपावली प्रदर्शन फूड फेस्टिव्हल’ आयोजित केल्याची माहिती सी. शोभाकाकी बावर मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष युवा नेते अमोल बाबर यांनी दिली. याबाबत अमोल बाबर म्हणाले, ग्रामीण व शहरी भागातील बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री असा एक मोठा उपक्रम आम्ही ठेवला आहे. हा उपक्रम सौ . शोभाकाकी बाबर मेमोरियल फाऊंडेशन आणि खानपुर पंचायत समिती यांच्यातर्फे होत आहे. येथील साळशिंगे रस्त्यावरील महात्मा गांधी विद्यामंदिराच्या जुन्या इमारतीच्या मागील मैदानावर हे प्रदर्शन होत आहे. स्टॉलसाठी कोणतीही फी नाही . अधिक माहितीसाठी संतोष बडवे यांच्याशी संपर्क साधावा . बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन होत आहे. यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहनही अमोल बाबर यांनी केले आहे.यावेळी माजी नगरसेवक अमर शितोळे आणि कृष्णात गायकवाड, भालचंद्र कांबळे, समीर कदम, रणजित पाटील, वैभव म्हेत्रे आदी उपस्थित होते.
विट्यात शोभा ग्रामीण महोत्सव २०२५ चे आयोजन
