पेठवडगाव नगरपालिका निवडणूक नगरसेवकांचे प्रभाग आरक्षण जाहीर

पेठवडगाव,  येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरसेवकांच्या २० जागांसाठी मराठा समाज सभागृहात प्रभागनिहाय आरक्षण सोड जाहीर करण्यात आली. जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण, मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागा सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडती नंतर सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडी आणि यादव आघाडी मधील इच्छुकांच्यात कही खुशी, कही गम असे वातावरण आहे.

 सोमवारी (दि.६) वडगावचे नगराध्यक्ष पद खुला प्रवर्ग जाहीर झाले. विरोधी यादव आघाडीच्या नेत्या विद्याताई पोळ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार फिक्स आहेत परंतु सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. बुधवारी नगरसेवक आरक्षण सोडती पार पडल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

 प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे. प्रभाग क्र. १ अ ) इतर मागासवर्गीय महिला ब) खुला पुरुष, प्रभाग क्र. २ अ ) अनुसूचित जाती महिला, ब) खुला पुरुषप्रभाग, क्र. ३ अ) अनुसूचित जाती पुरुष, ब) खुली महिला, प्रभाग क्र. ४ अ) खुला पुरुष, ब) खुली महिला, प्रभाग क्र. ५ अ ) इतर मागासवर्गीय पुरुष ब) खुली महिला, प्रभाग क्र. ६ अ ) खुला पुरुष, ब ) खुली महिला, प्रभाग क्र. ७ अ)इतर मागासवर्गीय पुरुष, ब) खुली महिला, प्रभाग क्र. ८ अ ) इतर मागासवर्गीय महिला, ब)खुला पुरुष, प्रभाग क्र. ९ अ ) इतर मागासवर्गीय महिला, ब)खुला पुरुष, प्रभाग क्र. १० अ) अनुसूचित जाती महिला, ब) खुला पुरुष