आगामी आष्टा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित झाल्याने राष्ट्रवादीच्या समर्थकांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. थेट नगराध्यक्ष पदासाठी प्रवीण माने यांच्या नावाला मंजुरी देऊन पहिल्या दिवसापासूनच प्रचाराला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आष्टा शहर यांच्या वतीने सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रभागनिहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस सुरुवात करण्यात आली. प्रभाग क्रमांक एक, दोन, सहा व आकरा येथे जोरदार बैठका झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थिती दर्शवीत आहेत. यावेळी पदाधिकारी संदीप गायकवाड, संजय सावंत, सुरेश मोटकट्टे, लखन मंडले, शोएब संधी, रवी चव्हाण हे प्रभागात केलेली विकासकामे, नागरिकांच्या समस्या, मूलभूत सुविधा, प्रभागातील संघटन, पक्षाची ध्येय धोरणे, विविध शासकीय योजना प्रभागात राबवणे आदीविषयी चर्चेतून संवाद साधीत आहेत. यावेळी प्रविण माने व प्रभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आष्ट्यात राष्ट्रवादीची प्रभागनिहाय संवाद बैठक
