लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेस प्रारंभ

भंडाऱ्याच्या उधळणीने पट्टणकोडोली सुवर्णमय; पुढील चार दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रम
पट्टणकोडोली,  महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, उत्तरप्रदेश आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेला रविवारी अमाप उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी असंख्य भाविकांच्या उपस्थितीत फरांडेबाबांचा हेडाम खेळ व भाकणूक सोहळा पार पडला.

 यात्रेचा आज पहिला दिवस असल्याने श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलंचा अखंड गजर करीत प्रमुख मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत यात्रेस प्रारंभ झाला. यात्रेतील फरांडेबाबांच्या भाकणुकीचा मुख्य सोहळा मंदिरात झाला. भाविकांनी उधळलेल्या भंडाऱ्याने पट्टणकोडोलीनगरी सुवर्णमय झाली. पुढील चार दिवस यात्रेसह धार्मिक विधी होणार आहेत.

सकाळी परंपरेनुसार विधीवत कार्यक्रमांना सुरुवात झाली. प्रथम गावचावडीत मानाच्या तलवारीचे पूजन झाले. तलवारीसह प्रकाश पाटील, रणजीत पाटील यांच्यासह गावडे,  कुलकर्णी, जोशी, आवटे, चौगुले, मगदूम आदी मानकरी व धनगर समाजाचे पंचमंडळी हे फरांडेबाबांना भेटण्यासाठी व निमंत्रण देण्यासाठी निघाले. ढोल, ताशा वाजत-गाजत व भंडाऱ्याच्या उधळणीत ही मिरवणूक भाणस मंदिर, कल्लेश्वर मंदिर, श्रींचे मंदिर या मार्गाने मंदिरासमोरील मानाच्या दगडी गादीजवळ दुपारी १ वाजता आली. या गादीवर नानादेव फरांडेबाबांना आलिंगन देऊन मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर भंडारा, लोकर, खारीक- खोबऱ्याची उधळण करण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात हेडाम खेळत तलवार पोटावर मारुन घेत फरांडेबाबांनी भाकणूक कथन केली. यात्रेमध्ये ठिकठिकाणी श्री विठ्ठल-बिरदेवाचे महात्म्य धनगरी ओवीतून सादर केले जात आहे. या कार्यक्रमालाही भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आज हेगडे, बोते यांचा नैवेद्य, दुपारी भाकणूक व श्रींची पहिली पालखी मिरवणूक काढण्यात आली. सोमवारी श्रींची दुसरी व तिसरी पालखी काढण्यात येणार आहे. मंगळवारी १४ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून भर यात्रा, सार्वजनिक नैवेद्य, श्रींची चौथी पालखी काढण्यात येणार आहे. बुधवारी १५ रोजी फुटयात्रा व श्रींची पाचवी अखेरची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर फरांडेबाबांचा गोंधळ नृत्य सोहळा व आराधना होणार आहे. गुरुवारी१६ रोजी फरांडेबाबांकडून भागीरथी देवीची ओटी भरणी व फरांडेबाबांचा निरोप समारंभ होणार आहे. यंदा मोठ्या प्रमाणात यात्रा भरल्याने भाविकांच्या आनंदाला उधाण आले आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
यात्रेमध्ये खेळणी, पाळणे, मेवा-मिठाई, प्रसाद, घोंगडी, भंडारा यासह विविध प्रकारचे स्टॉल व दुकाने व्यापाऱ्यांनी थाटली आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी एकेरी मार्गावरुन वाहतूक सुरु करण्यात आली आहे. तसेच भाविकांच्या वाहनांची ठिकठिकाणी सुरक्षितस्थळी वाहनतळ व पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा काळात पोलीस प्रशासन, प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय यंत्रणा, जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन व देवस्थान कमिटी यांच्याकडून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
 
यात्रेतील भाकणूकसात दिवसात पाऊस पडेल, रोहिणीचा पाऊस, मृगाचा पेरा संपूर्ण देशात होईल. दोन, सव्वादोन, अडीच आपल्या मनाप्रमाणे होईल. मिरची, रसभांडे कडक होईल. भारतीय लष्कराचे शौर्य जगात चमकेल. नवल्या मी होईन आणि हातात काठी घेऊन स्वतः मेंढ्या राखीन. राजकारणात गोंधळ होऊन उलथापालथ होईल. तसेच धर्माचे, भगव्याचे राज्य येईल. देवाची सेवा करणाऱ्याची रोगराई दूर होईल. माझ्या गुरुचे चरण जो धरेल त्याला मी सदैव कांबळाखाली धरेन. अशी भाकणूक खेलोबा वाघमोडे (नानादेव) फरांडेबाबांनी केली.कुलकर्णी, जोशी, आवटे, चौगुले, मगदूम आदी मानकरी व धनगर समाजाचे पंचमंडळी हे फरांडेबाबांना भेटण्यासाठी व निमंत्रण देण्यासाठी निघाले. ढोल, ताशा वाजत-गाजत व भंडाऱ्याच्या उधळणीत ही मिरवणूक भाणस मंदिर, कल्लेश्वर मंदिर, श्रींचे मंदिर या मार्गाने मंदिरासमोरील मानाच्या दगडी गादीजवळ दुपारी १ वाजता आली. या गादीवर नानादेव फरांडेबाबांना आलिंगन देऊन मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर भंडारा, लोकर, खारीक- खोबऱ्याची उधळण करण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात हेडाम खेळत तलवार पोटावर मारुन घेत फरांडेबाबांनी भाकणूक कथन केली. यात्रेमध्ये ठिकठिकाणी श्री विठ्ठल-बिरदेवाचे महात्म्य धनगरी ओवीतून सादर केले जात आहे. या कार्यक्रमालाही भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.