आष्टा येथे सुरू असलेल्या विभागीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये चौदा वर्षे मुला-मुलींच्या दोन्ही गटांमध्ये सांगलीने बाजी मारत विभागीय स्पर्धेत आपले स्थान अव्वल राखले. १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या सामन्यामध्ये सांगलीने अव्वल स्थान पटकावले तर मुलींच्या सामन्यात सातारा जिल्ह्याने बाजी मारली. मुला मुलींच्या दोन्ही विभागांमध्ये एकूण ४० संघांनी सहभाग नोंदवला होता.१४ वर्षे वयोगटातील मुलांच्या विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तर मुलींच्या विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत अनुक्रमे सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्हा यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला .
१७ वर्षे वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत अनुक्रमे सांगली, सातारा व सिंधुदुर्ग जिल्हा यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला तर मुलींच्या स्पर्धेमध्ये सातारा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्याने प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. यावेळी सांगली जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, वर्धा जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी जमीर अत्तार, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव चिमणभाऊ डांगे, विश्वनाथ डांगे, सांगलीच्या बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त धनश्री भांबुरे, सुनील शिनगारे उपस्थित होते. वर्धा जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जमीर अत्तार, सुनील शिनगारे, माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ बोते, राज्य क्रीडा मार्गदर्शिका प्रज्ञा वरेकर व अनिकेत बोडके यांच्या हस्ते विजेत्या संघाला प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आले.
