दिघंचीत जुगार अड्ड्यावर छापा

आटपाडी , दिघंची येथे स्थानिक गुन्हे अन्वेशणच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कम, दुचाकीसह १ लाख ७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. शनिवारी दुपारी दीघंची येथे आवळाई रोड देशमुखनगर येथे ही कारवाई केली.

स्थानिक गुन्हे अन्वेषणकडील सुनील जाधव यांनी फिर्याद दिली. जुगार अड्डाचालक मानाजी किसन ठोंबरे आणि महादेव बापू रणदिवे , जाफर लियाकतअली सय्यद , कुंडलिक रणदिवे (रा. सर्व दिघंची ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

देशमुखनगर येथे एका खोलीत ठोंबरे जुगार अड्डा चालवत होता. कारवाईत रोख ३७२० रुपये , पाच मोबाईल , दुचाकी असा एकूण १ लाख ७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.