हातकणंगले, हातकणंगले नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणूकीसाठी नगराध्यक्ष पदासह सतरा नगरसेवक कारंडे गट म्हणून निवडणूकीला सामोरे जाण्याचा निर्णय हातकणंगलेचे माजी सरपंच सदीप कारंडे यांनी जाहीर केल्याने नगरपंचायतीची
निवडणूक बहुरंगी होण्याचे संकेत आहेत.
हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी सोनाली उद्योग समुहाचे सर्वेसर्वा माजी सरपंच संदीप कारंडे यांनी आपल्या कारंडे गटातर्फे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून नगरपंचायतीला समविचारी पक्ष संघटना आणि विचारांचे कार्यकर्ते यांच्या बरोबर चर्चात्मक समझोता करून प्रभाग निहाय ताकतीचा उमेदवार कोण यावर चर्चा करून नगराध्यक्षपदासह सतरा प्रभागात उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने महायुती व महावि आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या निवडणूक लढविण्याच्या निर्णयाने प्रभागातील दिग्गज उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खूले असल्याने कारंडे गटाची ताकद या निवडणूकीत दिसणार आहे. तसेच सर्वसाधारण प्रभागातील नगरसेवक पाच पंचवीस मतांनी निवडून येतात कारडे गटाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने इच्छूकांच्या इकडून तिकडे उड्या पडणार आहेत.
