आष्टा, विशाल भाऊ शिंदे युवा मंच व विश्वराज शिंदे युथ फाऊंडेशनच्या वतीने आष्टा शहरातील बांधकाम कामगार यांचे मोफत ऑनलाईन नोंदणी व नूतनीकरण, अपॉईंटमेंट लेटर व सक्रिय नोंदणीधारकांना संसार उपयोगी किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी आष्टा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष गटनेते विशाल शिंदे, विश्वराज शिंदे, सुहास रुगे, महेश जाधव, मनोज मगदूम, हेमंत पवार, बाळासाहेब ठमके पाटील, रविराज कटारे, इंद्रजीत हिरुगडे, पवन गायकवाड हे प्रमुख उपस्थित होते. विशाल शिंदे म्हणाले, आष्टा व परिसरात बांधकाम कामगारांची संख्या वाढत आहे. त्यांना शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती मिळत नाही. शहरातील सर्वसामान्य कष्टकरी कामगारांना शासकीय योजनांचा लाभ व्हावा यासाठी युवा मंचच्यावतीने मोफत ऑनलाईन नोंदणी तसेच नूतनीकरण कॅम्पचे आयोजन केले आहे. या कॅम्पमध्ये नोंदणी नूतनीकरण करून त्यांना अपॉईंटमेंट देण्यात आली. मंचच्यावतीने आष्टा व परिसरातील सर्व कामगारांचा डेटा कलेक्ट केला असून शासनाच्या सर्व योजनांची माहिती त्यांना देण्यात येणार आहे. यावेळी उत्कर्ष माने, ऋतुराज पाटील, बंडू खोडकर, अभिजीत गायकवाड, कृष्णा जानवीकर, सुमित वायदंडे, ओंकार काटे, सिद्धार्थ हाबळे, भीमराव माने, सोन्या शेळके उपस्थित होते.
