आष्ट्यात शिवसेनेच्यावतीने रेशनकार्ड धान्य लाभ मोहिमेचे आयोजन कुदळे 

शहरातील पात्र गरजू रेशन कार्ड धारकांना धान्य मिळालेच पाहिजे, यासाठी शिवसेनेतर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत रेशन कार्ड धान्य लाभ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ गरजू पात्र नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी नगरसेवक वीर कुदळे यांनी केले. 

तालुका उपप्रमुख दिलीप कुरणे, आष्टा शहर प्रमुख राकेश आटुगडे, डॉ. नंदकिशोर आटुगडे, गणेश माळी, अर्चना माळी प्रमुख उपस्थित होते. वीर कुदळे म्हणाले, आष्टा शहरातील ज्या गोरगरीब शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांना रेशन कार्डावर धान्य मिळत नाही अशा सर्वच नागरिकांना धान्य मिळालेच पाहिजे यासाठी शिवसेनेतर्फे रेशन कार्ड धान्य लाभ मोहीम सुरू केली आहे. ज्या नागरिकांना रेशन कार्डावर धान्य मिळत नाही त्यांना शिवसेनेतर्फे मोफत अर्ज दिला जाणार आहे. अर्ज वितरण कार्यक्रम रविवार ता. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता ज्योतिर्लिंग चौक आष्टा येथे होणार आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांनी रेशन कार्डवर धान्य  मिळण्यासाठी अर्ज करत असताना, रेशनकार्ड झेरॉक्स, रेशनकार्डवरील सर्व सदस्यांची आधार कार्ड झेरॉक्स, तलाठी यांचा ५९ हजार रुपये पर्यंतचा उत्पन्न दाखला, तहसीलदार यांचा ५९ हजार रुपये पर्यंतचा उत्पन्नाचा दाखला, घराचा उतारा, शेतीचा उतारा, घराचा ८अ चा उतारा व एक फोटो घेऊन यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.