पट्टणकोडोली यात्रेत ४ लाखांचे दागिने लंपास

 
हुपरी,  भंडाऱ्याची उधळण आणि बिरोबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला अज्ञात चोरट्यांनी गालबोट लावले. भर यात्रेच्या दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये एका वयस्कर महिलेसह एकूण ४ महिलांचे सुमारे ४ लाख रुपये किमतीच सोन्याचे दागिने हातसफाईने लंपास करण्यात आले आहेत. या घटनांमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून हपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला 
आहे.

 १२ ऑक्टोबर या यात्रेच्या मुख्य दिवशी, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या घटना घडल्या आहेत. निलाबाई रावसो पाटील (व. व. ६०. रा. कसबा सांगाव) व इतर महिला या श्री विठ्ठल बिरदेव मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शनाच्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील ८० हजार रुपये किमतीचे १० ग्राम वजनाचे मंगळसूत्र,८० हजार रुपये किमतीचे १० ग्राम वजनाचे मंगळसूत्र, एक लाख ६० हजार किमतीची सोन्याची पाटली, ८० हजार किमतीचे १० ग्राम वजनाचे मंगळसूत्र असे एकूण चार महिलांचे ४ लाख किमतीचेसोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास के ले. याबाबतची फिर्याद निलाबाई रावसो पाटील यांनी हुपरी पोलिसांत दिली आहे.

 एकाच दिवशी जवळपासचार लाखांचे दागिने चोरीला या वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण अंदाजे ४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याने भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे हे करीत आहेत. यात्रेच्या गर्दीत मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या या अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.