विटा, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत “प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२५- २६” अंतर्गत आटपाडी व खानापूर तालुक्यातील महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी तब्बल २ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आ. सुहास अनिलभाऊ बाबर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या तीर्थक्षेत्रांना पर्यटनदृष्ट्या महत्वपूर्ण मंजुरी मिळाली असून,यामध्ये घाणंद (ता. आटपाडी) सिद्धनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता करणे ५० लक्ष, नेलकरंजी ( ता. आटपाडी) येथे भिमाशंकर – म्हसोबा मंदिर परिसरात सभामंडप व सुशोभीकरण १ कोटी, नागनाथनगर (ता. खानापूर) नागनाथ मंदिर परिसरातील सोयी-सुविधा विकास करणे ५० लक्ष या कामांचा समावेश आहे. आटपाडी व खानापूर तालुक्यातील महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी तब्बल २ कोटींचा निधी मंजूर झाल्यामुळे तालुक्यातील नागारिकांकडून आम. सुहास बाबर यांचे अभिनंदन केले जात आहे.
