आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस ताकतीने लढवणार

विटा,  सांगली जिल्हा परिषद, खानापूर पंचायत समिती व विटा नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समविचारी पक्षांना एकत्र घेऊन ताकतीने लढणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी दिली आहे.

 अॅड. मुळीक म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढण्याचा आमचा निर्णय झाला आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या आरक्षणावर आम्ही हरकती दाखल केलेल्या आहेत. त्याची चौकशी होऊन ३१ ऑक्टोंबर रोजी आरक्षण अंतिम होणार आहे. तसेच विटा नगरपालिकेच्या मतदार याद्यांवर दुबार नावे, वेगळ्या वॉर्डातील नावे अशा जवळपास दोन हजार हरकती आलेल्या आहेत. त्याची चौकशी होऊन ३ नोव्हेंबर रोजी या मतदार याद्या अंतिम होणार आहेत. तसेच विरोधी पक्षांनी राज्यातील मतदार याद्यांबाबत १ नोव्हेंबर रोजी मुंबईत मोठा मोर्चा आयोजित केलेला आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

शरदचंद्र पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नवीन युवा कार्यकर्त्यांना ५० टक्के जागांवर संधी देण्याचा धोरण घेतलेले आहे. तसेच जयंतराव पाटील यांनी 
या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याची आढावा बैठक घेतलेली आहे.

 अॅड. मुळीक म्हणाले, सध्याची राजकीय परिस्थिती विचारात घेता राज्य सरकार विषयी जनतेत असंतोष असून महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात फुट पडून शिवसेना शिंदे व उबाठा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार व अजित पवार असे गट झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीबरोबर असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा, शेकाप, माकप, संभाजी ब्रिगेड, रिपाई मधील काही गट यासह महाविकास आघाडीतील फुटून गेलेल्या लढविण्याचा निर्णय बैठकीत झाला असल्याची माहिती अॅड.बाबासाहेब कार्यकर्त्यांशी संपर्क करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुळीक यांनी दिली.

 यावेळी किसनराव जानकर, संग्राम देशमुख, संतोष जाधव, महेश कुपाडे, महेश फडतरे, सर्जेराव मदने, नानासाहेब मंडलिक, सुवर्णा पाटील, अमृता कुपाडे, भूमी कदम, बाळकृष्ण यादव, श्रेयस अधिकराव पाटील, अजित जाधव उपस्थित होते.