पेठवडगाव, मनपाडळे (ता. हातकणंगले) यथ अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी अतुल संपतराव जाधव-पाटील ( वय ३०, रा. मनपाडळे ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) यास पोक्सो कलम ६ नुसार १२ वर्षे सक्तमजुरी व १५०००रूपये दंड, दंड न भरलेस ७ महिने १५ दिवस साधी कैद तसेच दंडाच्या रक्कमेपैकी ७०००/- पिडीतेस देणेची शिक्षा सुनावणेत आली.
पिडीता ही तिची आई मयत झालेने तिची आज्जी आनंदी बापू माने ( रा. मनपाडळे) यांचे घरी राहणेस होती.आरोपी अतुल संपतराव जाधव-पाटील हा शेजारीच राहणेस होता. आरोपीने वेळोवेळी पिडीतेच्या घरी जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले. त्यातून पिडीता ही ७ महिन्याची गरोदर राहीली. याप्रकरणी पीडीतेच्या आजोबांनी वडगाव पोलिसात फिर्याद दिली.
या गुन्हयाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश – १, आर. व्ही. आदोने यांचे समोर झाली. सहाय्यक सरकारी वकील अॅड. अमृता ए. पाटोळे यांनी काम पाहिले. या कामी तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पैरवी अधिकारी विशाल पाटील, मिलींद टेळी यांनी मदत केली.
