ग्रामीण भागात घरफोडी आणि दागिन्यांच्या चोरीचे सत्र थांबलेले नसताना आता मंदिरेही सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.शहरातील बुरुड गल्लीतील मेदार लक्ष्मी मंदिरात दरवाज्यचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीवरील सुमारे चार लाख किमतीचे सोन्या – चांदीचे दागिने लांबविण्यात आले . पुजारी नेहमीप्रमाणे मंदिर उघडण्यासाठी गेल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला .मुख्य दरवाज्याला असलेले कुलूप कटरच्या साहाय्याने तोडून चोरटयांनी मंदिरात प्रवेश केला. देवीच्या मूर्तीवरील सोन्याची दोन मंगळसूत्रे ,हार असे अडीच तोळ्याचे दागिने तसेच मुकुट, कमरपट्टा ,पादुका तोडे असे आर्धा किलो चांदीचे दागिने लंपास केले. मंदिराच्या दोन्ही बाजूला घरे आहेत. त्यामुळे दरवाज्या उघडण्यापूर्वी कोणताही आवाज होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेऊन कुलूप तोडण्यात आला . पोलीस निरीक्षक एल. एच . गवंडी यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली.
सीसीटीव्ही बसवण्याआधीच…….
मेदार लक्ष्मी मंदिर कमिटीची सोमवारी बैठक झाली . या बैठकीत मंदिर व दागिन्यांच्या सुरक्षतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दोन दिवसात सीसीटीव्ही कॅमेरे बवण्यात येणार होते तत्पूर्वीच चोरटयांनी डाव साधल्याने पोलिसांसमोर तपासाचे आवाहन आहे .
