कोल्हापूरच्या कागल शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच विजयाच्या अभिनंदनाचे फलक (बॅनर) लागल्याचे दिसून आले आहे. कागल शहरातील विविध भागांत लावण्यात आलेल्या या बॅनरवर हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या एकत्रित आघाडीतील उमेदवारांच्या विजयाचा उल्लेख असून, गुलालाची उधळणही करण्यात आली आहे. या निवडणुकीत माजी कट्टर विरोधक असलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी एकत्र येत आघाडी केली होती. या आघाडीने कमाल केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हे दोघे एकत्र आल्याचे बोलले जात आहे. मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होणार असली तरी, त्याआधीच विजयाचे बॅनर लागल्याने हा प्रकार चर्चेचा विषय बनला आहे.
Related Posts
कारची दुचाकीला जोरदार धडक! पोलीस जखमी, चालक पसार
सर्किट हाउसजवळ रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार वासिम इसाक…
शिवराजसिंह चौहान यांचा आरोप
पश्चिम बंगालमध्ये ज्या पध्दतीने घटना घडत आहेत. त्या पाहता ममता बॅनर्जी यांच्यातील ‘ममता’आता संपली असून त्या क्रूर झाल्या आहेत असा…
हे कोल्हापूर आहे गड्या! हातात लाठी अन् सपासप वार; रणरागिणीचा VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पहायला मिळतात. पण सध्या सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडीओ व्हायरल होतोय. ते पाहुन…
