सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांची आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला या तीन तालुक्याच्या निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या मान्यतेने रामेश्वर मासाळ यांची निवडणूक प्रभारी म्हणून निवड करण्यात आल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिले.
गत निवडणुकीत राष्ट्रवादीने नगराध्यक्ष सह काही जागावर यश मिळवले होते.यंदा मात्र नगरपालिकेच्या निवडणुकीत 20 पैकी चार जागा लढवल्या होत्या त्यापैकी दोन जागांवर यश मिळाले. जागा वाटपात भारतीय जनता पार्टीची सरशी झाली होती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत आपले वर्चस्व ठेवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या असून तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार जागा असून पंचायत समितीच्या आठ जागा आहेत.
माहिती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादीला किती जागा मिळणार हे देखील यामध्ये महत्त्वाचे ठरणार असले तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पूर्ण ताकतीने लढवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत त्या पार्श्वभूमीवर रामेश्वर मासाळ यांची निवड महत्वपूर्ण मानली जात आहे. रामेश्वर मासाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षात सक्रिय आहेत.
गत निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या चार पैकी तीन जागेवर स्थानिक आघाडीचे तर पंचायत समितीवर पाच जागेसह स्थानिक आघाडीचे वर्चस्व होते तीन जागा काँग्रेस पक्षाकडे होत्या त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचे आव्हान आहे. परंतु रामेश्वर मासाळ यांना ग्रामीण राजकारणाची खडानखडा माहिती असल्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी त्यांची निवड फायदेशीर ठरेल.
