आयकर विभागाच्या वतीने करदात्यांसाठी जास्त दराने कर कपात टाळण्यासाठी, 31 मे पर्यंत तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्ही असे केले नाही, तर तुम्हाचे जास्त नुकसान होऊ शकते. आयकर नियमांनुसार, जर यदि पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर सध्या लागू असलेल्या दुप्पट दराने टीडीएस कापला जाईल.
आयकर विभागानुसार, प्रत्येक पॅन कार्डला आधार नंबरसोबत लिंक करणे गरजेचे आहे. तसेच जर वेळेवर असे नाही केले गेले तर पॅन कार्ड अमान्य घोषित करण्यात येईल. याआधी 24 एप्रिल 2024 रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने एक परिपत्रक काढून माहिती दिली.
त्यात असे म्हटले आहे की, ज्या लोकांच्या खात्यातून कमी TDS कापला गेला आहे. जर त्यांनी 31 मे पर्यंत पॅनला आधार कार्डशी लिंक केले तर त्यांना जास्त टीडीएस भरावा लागणार नाही. त्यामुले पॅनला आधारशी लिंक केल्याने, तुम्ही जास्त कर कपात टाळू शकाल.
तुम्ही अशाप्रकारे आधारसोबत पॅन लिंक करू शकता -Step 1: तुम्हाला आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in ऑफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल.
Step 2 : आता Quick Links वर क्लिक करुन Link Aadhaar ऑप्शनवर क्लिक करा.
Step 3 : पॅन आणि आधार नंबर टाकून नंतर व्हॅलिडेटवर क्लिक करा.
Step 4 : आधार कार्डमध्ये लिहिलेले आपले नाव आणि मोबाइल नंबर टाकून लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा.
Step 5 : आता मोबाईल नंबरवर आलेल्या ओटीपीला टाकून Validate वर क्लिक करावे. या प्रकारे तुमचे पॅन आधारसोबत लिंक होऊन जाईल.