बँकेत नोकरी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. 400 हून अधिक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे 10 वी पास असणाऱ्या उमेदवाराला देखील नोकरीसाठी अर्ज करण्याची संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आली आहे. 400 हून अधिक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
ही पदे स्वच्छता कर्मचारी किंवा उप कर्मचाऱ्यांची आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते नोंदणी लिंक उघडल्यानंतर अर्ज करू शकतात. हे करण्यासाठी त्यांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट centerbankofindia.co.in ला भेट द्यावी लागेल. या साईटवर सविस्तर माहिती दिली आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु : 21 जूनपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 27 जून 2024 आहे.
या मुदतीत विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल. दरम्यान, ज्यांनी यापूर्वी अर्ज केले आहेत, त्यांनी पुन्हा अर्ज करू नयेत, असे सांगण्यात आले आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या एकूण 484 पदांची भरती केली जाणार आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातील 10वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
अधिकृत वेबसाइट centerbankofindia.co.in
निवड प्रक्रिया?
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सफाई कर्मचारी पदासाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणीद्वारे केली जाईल. ऑनलाइन परीक्षा आयबीपीएसद्वारे घेतली जाईल तर स्थानिक भाषा परीक्षा बँकेद्वारे घेतली जाईल. निवड गुणवत्तेवर आधारित असणार आहे. दोन्ही परीक्षांमध्ये किमान कट ऑफ गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची निवड अंतिम मानली जाईल. ऑनलाइन परीक्षा 70 गुणांची असेल आणि स्थानिक भाषेसाठी ती 30 गुणांची असेल.