भारतीय विमानतळ प्राधिकरण व मुंबई एव्हिएशन अॅकॅडमी ही वैमानिक प्रशिक्षण कंपनी यांच्यामध्ये नुकताच करार झाला आहे. लवकरच कोल्हापुरातील विमानतळावर व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे.त्यामुळे आता कोल्हापुरातच वैमानिक घडणार आहेत.
कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल्स इमारतीमुळे कोल्हापूरचे नाव सर्वत्र झाले आहे. त्यामध्ये आता वैमानिक प्रशिक्षण केंद्र कोल्हापुरात सुरू होत असल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी जाण्याची आवश्यकता पडणार नाही.
कोल्हापूर विमानतळावर विद्यार्थ्यांना विमान चालविण्याचे प्रशिक्षण मुंबई एव्हिएशन अॅकॅडमीच्या वतीने देण्यात येणार आहे. वैमानिक प्रशिक्षण केंद्र लवकर सुरू करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, त्यासाठी कोल्हापूर विमानतळावर केंद्राला जागाही देण्यात आली आहे.