हिवाळा ऋतू सुरु होताच आपण उबदार आणि लोकरीच्या कपड्यांकडे वळतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहण्यासाठी लोकरीचे स्वेटर घालण्यास सुरुवात करतो. परंतु अनेकांना लोकरीच्या कपड्यांची ॲलर्जी होत असते. त्यामुळे शरीरात बारीक पुरळ होण्याच्या समस्या निर्माण होतात. तसेच कपड्याच्या ॲलर्जीने अनेकांना सर्दी होते. लोकरीच्या कपड्यांची खास गोष्ट म्हणजे ते परिधान केल्याने शरीरात हवा जाऊ देत नाही आणि थंडीपासून बचाव होतो. पण ते परिधान करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. या लेखात आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगतो, ज्यानंतर तुम्ही लोकरीचे कपडे घातले तर ॲलर्जीचा त्रास होणार नाही.
जेव्हा तुम्ही लोकरीचे कपडे घालत असाल तेव्हा प्रथम पूर्ण स्लीव्ह कॉटन इनर घाला. यानंतर लोकरीचे कपडे घालावेत. यामुळे लोकरीचे कपडे त्वचेच्या थेट संपर्कात येणार नाहीत आणि पुरळ उठण्याची समस्याही उद्भवणार नाही. लोकरीचे कपडे घालताना जास्त त्रास होत असेल तर त्वचेतील कोरडेपणा हेदेखील एक कारण असू शकते. अशावेळी लोकरीचे कपडे घालण्यापूर्वी शरीरावर मॉइश्चरायझरचा वापर करावा. यामुळे पुरळ किंवा लालसरपणा देखील येणार नाही. थंडीमध्ये तुमच्या त्वचेवर खूप ॲलर्जीचा त्रास होत असेल तर ऑलिव्ह ऑईल लावा. याशिवाय रात्री झोपताना व्हिटॅमिन ई युक्त नाइट क्रीम शरीर आणि चेहऱ्यावर मॉइश्चरायझ करा.लोकरीच्या कपड्यांमध्येही अनेक फॅब्रिक्स येतात. अशावेळी तुमच्या त्वचेनुसार लोकरीचे कपडे घाला. शुद्ध लोकर केसाळ असते. जास्त धागे सुटलेले लोकरीचे कपडे शक्यतो टाळा. त्वचेवर धागे घासने त्रास होऊ शकतो. अशावेळी त्वचेवर ताण पडतो व त्या ठिकाणी पुरळ येऊ लागतात.