थाटामाटात पार पडला नागा चैतन्य-सोभिताचा विवाहसोहळा…

बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला अभिनेत्री सोभिता धुलीपाला आणि अभिनेता नागा चैतन्य यांचा विवाहसोहळा अखेर काल पार पडला. दोघांच्याही लग्नाचे पहिले फोटो समोर आले असून केसांपासून ते पायपर्यंत नखशिखांत सजलेली सोभिता अतिशय सुंदर दिसत होती. तर वराच्या वेषात असलेल्या नागा चैतन्यच्या चेहऱ्यावरही हसू फुलले होते. दोघांच्याही लग्नाच्या विधीचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत. सोनेरी रंगाची साडी आणि त्यासह पारंपारिक दागिने घातलेली सोभिता अप्रतिम दिसत होती. तर ऑफ व्हाईट कलरच्या ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये नागा चैतन्यही एखाद्या राजकुमारासारखा दिसत होता. दोघांच्याही फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केलाय.

काही दिवसांपूर्वी या जोडप्याचा साखरपुडा झाला. तर काल ( 4 डिसेंबर) चैतन्य आणि शोभिता यांचे लग्न हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडले. या दोघांच्या लग्नाला त्यांचे कुटुंबीय, चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती, जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. नागा चैतन्य हा सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा आहे. तर सोभिता ही नावाजलेली अभिनेत्री आहे. सर्वांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काल पार पडलेल्या लग्नसहोळ्यादरम्यान नागा चैतन्यने ऑफ-व्हाइट धोती आणि कुर्ता घातला होता, तर सोनेरी कांजीवरम साडीमध्ये सोभिता एखाद्या परीपेक्षा कमी दिसत नव्हती. ओटीटीच्या जगात सोभिताचं मोठं नाव आहे. तिची मेड इन हेवन ही मालिका लोकांना खूप आवडली. ती तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. अभिनेता नागार्जुननेही त्याच्या एक्स अकाऊंटवरुन नागा चैतन्य आणि शोभिताचे फोटो शेअर केले आहेत. सध्या त्यांच्या फोटोंची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.