नागपुरात नव्या आमदारांचा शपथविधी, इकडे मुंबईत राज-उद्धव 5 स्टार हॉटेलमध्ये एकत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. तब्बल 33 वर्षांनंतर राज्याच्या उपराजधानीत म्हणजे नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार अन् शपथविधी पार पडत असताना दुसरीकडे मुंबईत मोठी घडामोड पाहायला मिळाली.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ मुंबईत ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये एकत्र आल्याची माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र नसले तरी आज एका कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र आले होते. एका खासगी कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकाच फ्रेममध्ये दिसले. रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मुलाचा विवाह सोहळा मुंबईत ताज लँड्स एन्ड या हॉटेल पार पडला. या विवाहसोहळ्याला राज ठाकरेंनी हजेरी लावली. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे यांनी यावेळी राज ठाकरेंचं स्वागत केले आहे. रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे पुत्र शौनक पाटणकर यांच्या लग्नात राज ठाकरेंनी हजेरी लावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

मात्र एका कार्यक्रमात राज आणि उद्धव एकत्र आले तरी दोन्ही भावांची थेट भेट झाली नाही. उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेनंतर राज ठाकरेंनी या लग्नाला उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज – उद्धव एकत्र यावे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. दरम्यान राज ठाकरे यांनी पाटणकर कुटुंबियांच्या निमंत्रणाला मान देत लग्नाला हजेरी लावली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.